inner-banner

अभियांत्रिकी विभाग

श्री. धनंजय मधुकर चामलवार
श्री. धनंजय मधुकर चामलवार
प्रमुख अभियांत्रिकी,
अभियांत्रिकी विभाग

वाहतुकीची कोंडी, वाहतुकीचे सुरळीत नियोजन, उत्तम पायाभूत सुविधा तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहतुक तसेच दळणवळण सुधारणेच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतलेले आहेत. अभियांत्रिकी विभागामार्फत मुंबई महानगर प्रदेशामध्ये अनेक नागरी पायाभुत सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने खालील प्रकल्प राबविण्यात येत आहेत :

  • विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामधील पायाभूत सुविधा विकसीत करण्यासाठी एम.यु.आय.पी. प्रकल्प राबविला आहे. मुंबई महानगरात मुंबई प्राधिकरण क्षेत्रातून रोज लाखो नागरीक कामा निमित्त येत असतात. त्यांना मुंबईतील नागरी सुविधांचा लाभ घेता यावा या दृष्टिने मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा विस्तार मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील प्राधिकरण क्षेत्रात करणे गरजेचे आहे, ज्यायोगे भविष्यात वाहतूकीची कोंडी दुर होण्यास मदत होणार आहे. तसेच उपनगरीय परिक्षेत्राचा विकास होण्या व औद्योगिक भरभराटी होऊन रोजगारांच्या नवनवीन संधी उपनगरीय परिक्षेत्रात उपलब्ध होऊन बृहन्मुंबईच्या पायाभूत सुविधांवर पडणारा अतिरिक्त भार कमी करण्यास्तव मदत होणार आहे. मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाचा या प्रदेशांमध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, कर्जत, खालापूर, पनवेल, वसई-विरार आणि मिरा-भाईंदर रस्ते, उड्‌डाणपूल करीता सुमारे रु. 1493.26 कोटी इतक्या अंदाजित खर्चाच्या कामांस मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत दिनांक 24 डिसेंबर, 2007 रोजी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विस्तारीत एम.यु.आय.पी. प्रकल्पात 3 खाडी पुल बांधणे, 2 रेल्वे उड्‌डाणपूल बांधणे, 9 उड्‌डाणपूल बांधणे व 131.50 कि.मी. रस्त्याचे रुंदीकरण व सुधारणा करणे अशा कामांचा समावेश आहे. त्यापैकी 61.00 कि.मी. रस्त्याचे काम व पनवेल, वाघबिळ, मानपाडा व पातलीपाडा येथील उड्‌डाणपूलांची कामे पुर्ण झाली आहेत. वसई रेल्वे उड्‌डाणपूल, शिळ महापे, कापुरबावडी व नायगांव - जुचंद्र रस्त्यावरील रेल्वे उड्‌डाणपूल ही कामे प्रगतीत आहेत. यातील काही कामे ठाणे महानगरपालिका व म.रा.र.वि. महामंडळाकडे प्राधिकरणाकडून निधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्यामार्फत कार्यन्वित करण्यात येत आहेत. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी मुंबई महानगर प्रदेशातील धार्मिक स्थळे / पर्यटन स्थळे / औद्योगिक क्षेत्र / शैक्षणिक क्षेत्रास जोडणा-या, अंदाजित किंमत रु. 1113.35 कोटी किंमतीच्या महत्वाच्या अतिरिक्त कामांस, विस्तारीत एम.यु.आय.पी. अंतर्गत दि. 8 सप्टेंबर, 2011 रोजी मान्यता प्रदान केली आहे. त्यामध्ये 05 उड्‌डाणपूल बांधणे व 145.12 कि.मी. रस्त्यांचे रुंदीकरण व सुधारणा करण्याचा समावेश आहे. रस्त्यांच्या सुधारणांपैकी 50 कि.मी. रस्त्यांचे काम पुर्ण झाले असून वंजारपट्टी येथील उड्डाणपूल व रस्त्यांची उर्वरीत कामे मार्च, 2014 तर माणकोली व राजणोली या उड्‌डाणपूलांची कामे डिसेंबर, 2015 पर्यंत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. शिळफाटा - कल्याण फाटा व मुंब्रा बायपास जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या कामांचे सविस्तर अंदाजपत्रके तयार करणेचे काम प्रगतीपथावर आहे. मुंबई महानगर पद्रेश विकास प्राधिकरणाच्या दि. 27/06/2014 रोजी झालेल्या 134 व्या बैठकीमध्ये रु. 3628.51 कोटी रकमेची एकुण 17 कामे मंजुर झाले असून त्यामध्ये 132.99 कि.मी. रस्त्यांची कामे, 32 पुलांचे कामे व 3 बोगदे या कामांचा समावेश आहे. सदर कामापैकी 8 कामांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. उर्वरीत कामे भूसंपादन व पर्यावरणाबाबतची प्रक्रिया पुर्ण करुन हाती घेण्यात येतील..
  • विरार ते अलिबाग – बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका (Multi Modal Corridor) – मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने विरार ते अलिबाग या 140 कि.मी. लांबीच्या बहुउद्देशिय वाहतूक मार्गिकेचे नियोजन केले आहे.
  • मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प - मुंबईची वाढती लोकसख्या तसेच त्यात भविष्यात होणारी वाढ लक्षात घेता बृहन्मुंबईतील रस्त्यांचे सुधारीकरण तसेच वाहतुकीचे नियमन सुरळीतपणे होण्याच्या हेतूने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने तातडीने पावले उचलण्याच्या दृष्टीने मुंबई नागरी पायाभुत सुविधा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
  • मुंबई पारबंदर प्रकल्प – प्रस्तावित मुंबई पारबंदर प्रकल्पामुळे मुंबई बेटावरील वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई बेट ते मुख्य् भूमी (नवी मुंबई) दरम्यान वेगवान वाहतुक शक्य् होईल व त्यामुळे मुख्य् भूमीवरील नवी मुंबई व आसपासच्या प्रदेशाचा विकास होईल.
  • पूर्व मुक्त मार्ग – "पूर्व मुक्त मार्ग" हा 16.6 कि.मी. लांबीचा शहराच्या पूर्वेकडील भागाला जोडणारा एक जलद मार्ग असून त्याद्वारे पूर्व उपनगरे व दक्षिण मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी वाहतुकीची कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. यामध्ये 9.29 कि.मी. लांबीच्या उन्न्त मार्गाची बांधकाम (देशातील सर्वात जास्त् लांबीचा दुसऱ्या क्रमांकाचा उन्न्त मार्ग), अनेक उड्डाण पूल, रेल्वे ओलांडणी पूल आणि 500 मी. लांबीचे दोन बोगदे समाविष्ट् आहेत.

 

Engineering Department

प्रकल्प यादी

अ) मोठे प्रकल्प

1. मुंबई पारंबदर प्रकल्प (शिवडी ते न्हावा).

2. महापौर निवासस्थानच्या परिसरात स्व. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करणे.

3. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिल, दादर, मुंबई.

4. सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प.

ब) मुंबई नागरी पायाभूत सुविधा (MUIP)

5. कलानगर जंक्शन येथे उड्डाणपूलाचे संरेखन व बांधकाम करणे.

6. पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर, घाटकोपर येथे वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविणे.

7. वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बांडोंगरी हिल कांदिवली, मुंबई येथे टीओआय बिल्डिंगच्या खाली किमी 510005 ते 510095 दरम्यान भूसंखलन क्षेत्राचे स्थिरीकरण आणि शमन.

7(a). जनता कॉलनी, जोगेश्वरी येथे वाहन सबवेचे रुंदीकरण आणि बांधकाम @ Ch. 516/800 वेस्टर्न हायवे क्र. 6 वर.

8.मुंबई नागरी पयाभुत सुविधा प्रकलपांतर्गत सांताक्रुझ - चेंबूर जोड रस्त्याचे वाकोला जंक्शन आंबेडकरे चौक / युनिर्व्हसिटी जंक्शन व बीकेसी जंक्शन मिळून मिठी नदी ते वाकोला पूलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे व MTNL जंक्शन बीकेसी ते एलबीएस मार्ग उड्डाणपूलाला जोडणार उन्नत मार्ग भाग - 1.

8(a).भारत डायमंड कंपनी, वांद्रे - कुर्ला संकुल ते वाकोला जंक्शन येथे जोडणारा उन्नत मार्ग बांधणे भाग- 2.

9. शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प.

क) विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा (Extended MUIP)

10. ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प भाग 1: ठाणे बेलापूर रोड आणि राष्ट्रीय महामार्ग - 4 दरम्यान एलिव्हेटेड रोडचे डिझाईन आणि बांधकाम.

10(a). ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प : ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग - 4 बोगद्याचे व रस्त्याचे बांधकाम.

10(b). मुलुंड ऐरोली पूल ते ठाणे - बेलापूर रस्ता दरम्यानच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम करणे.

11. कल्याण बाह्य वळण रस्ता भाग - 4, 5, 6 व 7 (दुर्गाडी चौक ते टिटवाळा).

12. पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथील रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करणे.

13. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाय जंक्शन मुंब्रा येथे उड्डाणपूलाचे बांधकाम, शिळ फाटा येथे उड्डाणपूल तसेच कल्याण फाटा येथे उड्डाणपूलाचे व भुयारी मार्गाचे बांधकाम.

14. मुंबई - पुणे (जुन्या) राष्ट्रीय महामार्गावर नावडे फाटा जंक्शन येथे उड्डाणपूलाचे बांधकाम व रस्त्याचे रुंदीकरण करणे.

15. माणकोली मोठागाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे.

16. प्रस्तावित माणकोली मोटागाव लिंक रोडवरील उल्हास खाडीवर सहा पदरी पुलाचे बांधकाम करणे.

17.दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधकाम करणे.

प्रकल्पाची माहिती

1) मुंबई पारबंदर प्रकल्प (शिवडी ते न्हावा)

प्रस्तावना :

मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याबरोबरच नवी मुंबईतील प्रदेशाचा विकास करण्याच्या दृष्टीने मुंबई पारबंदर प्रकल्पाचा प्रस्ताव सुमारे 30 वर्षांपूर्वीपासून विचाराधीन होता. मुंबई व नवी मुंबई यामधील वाहतूक वेगवान व्हावी या हेतूने मुंबई बेटावरील शिवडी ते मुख्यभूमी (नवी मुंबई) वरील न्हावा या दरम्यान पूलबांधण्याचा विचार करण्यात आला होता. शासनाने दिनांक 04 फेब्रुवारी, 2009 च्या शासननिर्णयान्वये या प्रकल्पाची मालकी व अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे असेल असे आदेशित केले. त्याचप्रमाणे या प्रकल्पाकरीता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे निधी उपलब्ध करण्यात येईल असेही आदेशित करण्यात आले. मुंबई पारबंदर प्रकल्प हा यापूर्वी रस्ते वाहतूक प्रकल्प म्हणून नियोजित होता. महाराष्ट्र शासनाने दिनांक 08 जून, 2011 च्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे मुंबई पारबंदर प्रकल्पास प्रादेशिक विकास प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे.

प्रकल्पाचा वाव :

प्रकल्पाच्या वावामध्ये मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किमी लांबीच्या 6 पदरी (3+3 मार्गिका) पुलाचा अंतर्भाव आहे. यापुलाची समुद्रातील लांबी सुमारे 16.5 किमी असून जमिनीवरील पुलाची (पोचमार्ग-Approaches) लांबी सुमारे 5.5 किमी इतकी आहे. यापुलाला मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील शिवाजी नगर व राष्ट्रीय महामार्ग-4 ब वर चिर्लेगावाजवळ आंतरबदल (Interchanges) आहेत.

प्रकल्पाचे फायदे :

सदर प्रकल्पामुळे नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशाचा विकास होणार असून प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाशी वेगवान दळणवळण शक्य होणार आहे. मुंबई व नवी मुंबई, रायगड, कोकण यामधील अंतर कमी झाल्यामुळे इंधन व वाहतूक खर्चात बचत होणार आहे. त्याप्रमाणे मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाची अंमलबजावणी :

मुंबई पारबंदर प्रकल्पाची अंमलबजावणी डिझाईन-बिल्ड पध्दतीने करण्यात येत आहे. जायका (JICA-Japan International Cooperation Agency) या जपानी संस्थेने सदर प्रकल्पाकरीता कर्ज देण्याचे मान्य केले आहे.

प्रकल्पाची सद्य:स्थिती :

  1. जायकाने सदर प्रकल्पाकरीता कर्ज देण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याकरीता प्रकल्पाचे प्राथमिक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणामध्ये तांत्रिक बाबींसोबतच प्रकल्पाचा पर्यावरणावर व सामाजिक जीवनावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यात आला. सदर सर्वेक्षणाबाबतचा अंतिम अहवाल जायकाने सादर केला आहे. सदर सर्वेक्षणाअंती जायकाने प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत ₹.17,843 कोटी इतकी निश्चित केली असून या किंमतीमध्ये बांधकामाची किंमत, महागाई, आकस्मिक बाबींवरील खर्च, भूसंपादन, प्रशासकीय खर्च, बांधकामाच्या कालावधीतील व्याज इ. बाबींचा समावेश आहे. जायकातर्फे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास परस्पर कर्ज देण्याबाबत केंद्र शासनाने मान्यता दिली असून कर्ज देण्याबाबतच्या करारावर दिनांक 31 मार्च, 2017 आणि दि. 27 मार्च, 2020 रोजी स्वाक्षऱ्या झाल्या आहेत.
  2. केंद्रशासनाच्या पर्यावरण व वने विभागाने प्रकल्पास 25 जानेवारी, 2016 रोजी "कोस्टल रेग्युलेशन झोन" विषयक मान्यता दिलेली आहे. तसेच प्रकल्पाकरीता 47.417 हेक्टर वनजमीन वळती करण्यास (Diversion) दि. 22 जानेवारी, 2016 रोजी तत्त्वत: मान्यता दिलेली आहे. त्याचप्रमाणे कांदळवने तोडण्याकरीता मा. मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी आणि प्रकल्पाचे बांधकाम करण्याकरीता वन विभागाची परवानगी प्राप्त झाली आहे. प्रकल्पास इतर परवानग्या (उदा. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सिडको, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, भाभा अणुसंशोधन केंद्र, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड इ.) देखील प्राप्त झाल्या आहेत.
  3. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सदर प्रकल्पाकरीता एइकॉम एशिया कंपनी लि.-पडेको कंपनी लि. - दार-अल-हंदाश - टी.वाय.लिन इंटरनॅशनल  (कन्सॉर्शिअम) यांची डिसेंबर, 2016 मध्ये सल्लागार म्हणून नेमणूक केली.
  4. प्रकल्पाचे बांधकाम हे 3 स्थापत्य कंत्राटांद्वारे व 1 इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (ITS) कंत्राटाद्वारे करण्यात येणार आहे.
  5. प्रकल्पाच्या पॅकेज-1 करीता लार्सन अँड टुब्रो लि.-आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं. लि. कंसोर्शिअम यांची, पॅकेज-2 करीता देवू इंजिनिअरींग अँड कन्स्ट्रक्शन कंपनी लि.-टाटा प्रोजेक्ट्स लि. जेव्ही यांची आणि पॅकेज-3 करीता लार्सन अँड टुब्रो लि. यांची कंत्राटदार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सदर कंत्राटदारांना दि. 23 मार्च 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.
  6. कंत्राटदारांनी प्रत्यक्ष कार्यस्थळावर पाईल पध्दतीचा पाया, पाईल कॅप व पुलाच्या खांबांचे काम तसेच पुलाचे सेगमेंट बनविण्याचे काम कास्टींग यार्डमध्ये सुरु केले आहे. तसेच पुलाच्या गाळयांच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. इंटेलीजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीमकरीता निविदा प्रक्रिया प्रगतीपथावर आहे.
  7. प्रकल्पाचा बांधकाम कालावधी सुमारे साडेचार वर्षे आहे. त्यानुसार प्रकल्प माहे सप्टेंबर, 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन होते. परंतु कोविड- 19 महामारीमुळे प्रकल्प माहे सप्टेंबर, 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

2) महापौर निवासस्थानाच्या परिसरात बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम करणे.

प्रस्तावना:

  • बाळासाहेब ठाकरे यांची स्मृती जपण्यासाठी मुंबई येथे भव्य स्मारक उभारण्याची बाब शासनाच्या विचाराधीन असल्याने, स्मारकासाठी दादर येथील महापौर निवासस्थानाच्या परिसराची निवड महाराष्ट्र शासनामार्फत करण्यात आलेली आहे.
  • नगर विकास विभागाकडून महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एमआरडी-2018/प्र.क्र. 147/नवि-7, दि. 16 मार्च, 2021 अन्वये टप्पा 1 रू. 250 कोटी व टप्पा 2 रू. 150 कोटी असे एकूण रू. 400 कोटी खर्च प्राधिकरणाच्या निधीतुन मान्यता दिलेली आहे व प्राधिकरणाची नेमणुक या प्रकल्पाच्या अंमलबजावणी करीता करण्यात आलेली आहे.
  • महापौर निवासस्थान वास्तु हि ब्रिटिश कालीन असल्याने व वारसा संवर्धन सुचीमध्ये श्रेणी 2 ब मध्ये समाविष्ट आहे. टप्पा-1 व टप्पा-2 मध्ये वर्गीकरण करण्यात आलेले आहे.
  •  स्मारकाच्या टप्पा-1 मध्ये महापौर निवासस्थान वास्तुचे वारसा संवर्धन करून त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जीवनपट उलगडून दाखविणारे कलाचित्रांचे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त स्मारक प्रकल्पामध्ये कुंड इमारत, प्रवेशव्दार इमारत व प्रशासकीय इमारत बांधण्याच्या कामाचा समावेश आहे व स्मारकास साजेस सभोवतालच्या परिसरात बागबगिचा तयार करण्यात येणार आहे.

टप्पा-2 मध्ये हार्डवेअर आणि सहाय्यभूत सेवा, तंत्रज्ञान, लेझरशो, डिजिटल मॅपिंग प्रोजेक्शन, कथा/ गोष्टी सांगणे, चित्रपट, व्हर्चूअल रियालटी, ऑडिओ व्हिजुअल आणि तांत्रिक घटक इत्यादी.कामांचा समावेश आहे.  टप्पा -2 अंतर्गत काम अंदाजपत्रकीय स्तरावर आहे.

प्रकल्पाचे तपशील:

टप्पा 1 मधील कामाची माहिती

  1. निविदा देकार                              : रु. 180.99 कोटी
  2. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार          : आभा नरेन लांबा असोसिएट्स
  3. टप्पा 1 कंत्राटदार                         : टाटा प्रोजेक्टस लि.     
  4. कार्यारंभ आदेश दिनांक                : 24.03.2021
  5. काम पूर्ण करण्याचा कालावधी        : 14 महिने
  6. काम पूर्ण करण्याचा दिनांक           : मे, 2022
  7. अंतर्भुत कामे                               :
  • महापौर निवासस्थानाची पुन:र्स्थापना व सुशोभिकरण करणे
  • कुंड इमारत बांधणे (इंटर प्रिटेशन इमारत)
  • प्रवेशव्दार इमारत
  • प्रशासकीय इमारत (ॲडमिन सेंटर) बांधणे.

सद्य:स्थिती :- टप्पा 1

  1. भौतिक प्रगती  -   22%
  2. आर्थिक प्रगती -  10%             

3) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक इंदू मिल, दादर, मुंबई 

प्रकल्पाची ठळक वैशिष्ठये:

  • भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य कांस्य पुतळा जग प्रख्यात मूर्तिकार पद्म भूषण श्री राम सुतार ह्यांच्या हस्ते साकारला जात आहे.
  • स्मारकाची एकूण उंची जमिनी पासून 137.15 मी (450 फूट) आहे. त्यामध्ये पुतळ्याची उंची 106.7 मी (350 फूट) व पादपीठ 30.45 मी (100 फूट ) उंच आहे. 
  • या स्मारकामध्ये खुल्या हरित जागेचं (सुमारे 68%) विशेष नियोजन केलेगेले आहे.
  • समुद्र किनाऱ्यालगतच्या प्रेक्षणीय दृश्याची अनुभूती घेता येईल.
  • विद्यमान तळ्याची सुधारणा व सुशोभीकरण करून, महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याची प्रतिकृती करण्यात येईल.
  • हा प्रकल्प हरित इमारत प्रमाणपत्रासाठी नियोजित  केला आहे.

प्रकल्पाची माहिती :

1) प्रकल्पाचा मुळ संकल्पनेनुसार खर्च रु.763.05 कोटी (प्रशासकीय मान्यता); रु.709 कोटी (बांधकाम खर्च)
प्रकल्पाचा सुधारित संकल्पनेनुसार खर्च रु.1089.95 कोटी (प्रशासकीय मान्यता); रु.990.86कोटी (बांधकाम खर्च)
2) कार्यादेश दिनांक 9 फेब्रुवारी, 2018
3) प्रकल्पाचा कालावधी 8 फेब्रुवारी , 2021 (36 महिने)
4) प्रकल्प पूर्ण होण्याचा अपेक्षित कालावधी मार्च, 2024
5) नियोजित इमारती
  • पादपीठ इमारत
पादपीठ इमारतीची उंची 30 मी. (100 फूट) असून इमारतीच्या पादपीठामध्ये बौद्ध वास्तु रचना शैलीतील घुमट, संग्रहालय व प्रदर्शन भरवण्याची सोय असेल. सदर पादपीठामध्ये 6.0 मी रुंदीचे, अंतरिक व बाह्य चक्राकार मार्ग पुतळ्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी प्रस्तावित केले आहेत. पादपीठावर वर पोहोचण्यासाठी उदवाहकाची तरतुद केली आहे.
  • पुतळा:
स्मारकाचे मुख्य आकर्षण व केंद्रबिंदू भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा 106.68 मी (350 फूट) असेल.
  • प्रवेशद्वार इमारत :
माहिती केंद्र, तिकीट घर, सामान कक्ष, स्मरणिका कक्ष, स्वच्छतागृह, सुरक्षा कक्ष, नियंत्रण कक्ष, उपहारगृह इत्यादिचा समावेश असेल.
  • संशोधन केंद्र :
100 लोकांची आसन क्षमता असलेले 4 व्याख्यानवर्ग व ग्रंथालय.
  • प्रेक्षागृह (क्षमता 1000 आसन).
  • ध्यानसाधना केंद्र.
  • पादपीठ इमारतीच्या भवती अंतरिक व बाह्यपरिक्रमा पथ.
  • २ मजली तळघर वाहनतळ (क्षमता - 467 चारचाकी).
6) वर्तमान स्थिती
  • स्मारक इमारत व पुतळा वगळता प्रकल्पाचे झालेले अंदाजित काम 48.15% आहे. स्मारक इमारतीचे 6.0% काम पूर्ण.
  • प्रवेशद्वार इमारत, वाहनतळ, प्रेक्षागृह, संशोधन केंद्र(ग्रंथालय व व्याखान वर्ग), स्मारक इमारत काम प्रगती पथावर.

4) सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्प.

प्रकल्पाचा तपशिल :-

            सुर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या आराखडयानुसार सुर्या धरणाजवळील कवडास बंधाऱ्यातून उचलण्यात आलेले पाणी  सुर्यानगर येथील प्रस्तावित जलप्रक्रिया केंद्रात शुध्द करण्यात येईल.  अशाप्रकारे शुध्द केलेले पाणी राज्य महामार्ग, जिल्हा परिषद रोड व राष्ट्र्रीय महामार्ग क्र. 8,च्या बाजूने टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीद्वारे वसई-विरार महानगरपालिकेकरिता काशिदकोपर येथील जलाशय व मिरा-भाईदर महानगरपालिकेचा घोडबंदर-चेने येथील जलाशयापर्यत पाठविण्यात येईल. पुढील पाण्याचे वितरण  सबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामार्फत करण्यात येईल.

अ.क्र. लाभधारक महानगरपालिका 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या सध्याची मागणी (द.ल.लि/ दिन) सध्याचा पुरवठा (द.ल.लि/ दिन) तुट सुर्या पाणी पुरवठा प्रकल्प (द.ल.लि/ दिन))
1. वसई-विरार शहर महानगरपालिका (VVCMC) 12.21 लक्ष 258 130 128 (49.61%) 185
 2. मिरा-भाईदर महानगरपालिका (MBMC) 8.15 लक्ष 172 106 66 (38.37%) 218
एकुण 403 (द.ल.लि/ दिन)

 

प्रकल्पाचे वैशिष्टय :-

  1.उदंचन केंद्र-403 द.ल.लि. प्रतिदिन

  2. जलशुध्दीकरण केंद्र- 403 द.ल.लि. प्रतिदिन

  3.ब्रेक प्रेशर टॅक – 0.8  द.ल.लि.

  4. 80.71 कि.मी.लांबीची जलवाहिनी .

  5. मेंढवण खिंड येथील भुमिगत बोगदा  एकुण लांबी 1.7 कि.मी.

  6. तुंगारेश्वर येथील भुमिगत बोगदा  एकुण लांबी 4.8 कि.मी.

  7. काशिदकोपर येथील जलकुंभ 38 द.ल.लि

  8. चेने येथील  जलकुंभ 45 द.ल.लि.

  9. प्रकल्पाची किंमत- 1329.01 कोटी

  10. प्रकल्प पुर्ण होण्याची तारीख 15.04.2023.

  प्रकल्पाची सद्यस्थिती :-

   1.जिओटेक्निकल इन्हेस्टिगेशन आणि डिझाईन इंजीनियरिंग 100% पुर्ण.

   2.जलवाहिनी टाकण्याचे काम 33.5 किमी पुर्ण.

   3.उदंचन केंद्र उभारण्याचे काम 47% पुर्ण.

   4.जलशुध्दीकरण उभारण्याचे बांधकाम 25% पुर्ण.

   5.मेंढवनखिंड येथील बोगदा 560 मीटर पुर्ण.

   6.तुंगारेश्वर येथील बोगदा इनलेट आणि आउटलेट शाप्टचे बांधकाम 100% पुर्ण..

5) कलानगर जंक्शन येथे उड्डाणपूलाचे संरेखन व बांधकाम करणे.

प्रकल्पाचा तपशील:

  1. एकूण खर्च        :  रु. 103.73 कोटी
  2. कार्यारंभ आदेश     : दि. 02/01/2017.
  3. कामाचा कालावधी  : 30 महिने
  4. अपेक्षित कार्य पूर्णत्वाचा दि. 30/11/2021.
  5. प्रकल्पाचा तपशील :
  1.  पुलाची एकूण लांबी: : आर्म B (BWSL to BKC) 804 मी., आर्म C (BKC to BWSL) 653 मी., आर्म D (Dharavi to BWSL) 340 मी.
  2. पुलाची रुंदी: 9.9 मी. प्रत्येकी आर्म.

    सद्यस्थिती :

    आर्म C दि.21/02/2021 रोजी व आर्म B दि. 31/05/2021 रोजी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे.

  1. भैतिक प्रगती- 94.487%
  2. आर्थिक प्रगती- 93.517%

6) पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर, घाटकोपर येथे वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविणे. प्रकल्पाची माहिती : 

  • पूर्व मुक्त मार्ग व सांताक्रुझ चेंबूर जोडरस्ता पुर्ण झाल्यानंतर या मार्गांवरील वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर येथे मिळते. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.
  • या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्राधिकरणामार्फत छेडानगर वाहतुक सुधारणा प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
  •  या प्रकल्पांतर्गत तीन उड्डाणपुल व वाहनांकरीता भुयारी मार्गाचे काम करण्यात येत आहे.

 प्रकल्पाची वेशिष्टे :

1. प्रकल्पाची किंमत : रु. 223.85 कोटी.

2. कामास सुरुवात केल्याचा दिनांक : 29 जून, 2018.

3. अपेक्षित कालावधी : 36 महिने.

4. प्रकल्प पुर्णत्वाचा अपेक्षित दिनांक : 30 जून, 2022.

प्रकल्पाचे भाग :

      1. उड्डाणपुल क्र. 1 : अस्तित्वातील पुलास समांतर शिव ते ठाणे दिशेकडील उड्डाणपुल. (3 मार्गिका)

          लांबी – 680 मी.

          रुंदी – 12 मी.

     2. उड्डाणपुल क्र. 2 : मानखुर्द ते ठाणे दिशेकडील दुसऱ्या पातळीवरील पुल (2 मार्गिका)

          लांबी – 1290 मी.

          रुंदी – 8.5 मी.

  1. उड्डाणपुल क्र. 3 : अस्तित्वातील छेडानगर उड्डाणपुलास सांताक्रुझ चेंबूर जोडरस्त्यास जोडणारा     

 पुल  (2 मार्गिका)

          लांबी – 638 मी.

          रुंदी – 8.5 मी.

      4. वाहनांकरीता भुयारी मार्ग

          लांबी – 518 मी.

          रुंदी – 37.2  मी.

प्रकल्पाची सद्यस्थिती :

       भौतिक प्रगती – 61%

       आर्थिक प्रगती – 58%

7) वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे, बांडोंगरी हिल कांदिवली, मुंबई येथे टीओआय बिल्डिंगच्याखाली किमी 510005 ते 510095 दरम्यान भूस्खलन क्षेत्राचे स्थिरीकरण आणि शमन.

प्रकल्पाचे वैशिष्ट्य :

  • 4 ऑगस्ट 2020 रोजी कांदिवली पूर्वेला 75 मीटर लांबीच्या आणि सुमारे 25 मीटर उंचीच्या गर्दीच्या
  • WEH वर एक आपत्तीजनक भूस्खलन झाले.
  • यामुळे संपूर्ण पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला बांडोंगरी हिल कांदिवली
  • 510005 ते 510095 किमी दरम्यान भूस्खलन क्षेत्राचे स्थिरीकरण आणि शमन करण्यासाठी
  •  काम प्रगतीपथावर आहे.
  • एमएमआरडीएने त्याच्या डिझाइनसाठी IITBombay ची डिझाईन निविदा मागवून आणि
  • व्हीजेटीआयच्या देखरेखीखाली पीएमसी म्हणून नियुक्ती केली आहे.

प्रकल्पाचा तपशील :

निविदा खर्च - रु. 14.35 कोटी

कामाची तारीख: 26 मार्च 2021.

पूर्ण कालावधी - 9 महिने म्हणजे 25/12/2021.

कामाची व्याप्ती: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेबंडोंगरी हिल कांदिवलीमुंबई येथे टीओआय बिल्डिंगच्या खाली किमी 510005

 ते 510095 दरम्यान भूस्खलन क्षेत्राचे स्थिरीकरण आणि शमन

लांबी - 90 मीउंची - 25 मी.

सध्याची स्थिती :

 VJTI च्या देखरेखीखाली काम प्रगतीपथावर आहे. सध्या 35% काम पूर्ण झाले आहे.

1. बट्रेस वॉल आरसीसी काँक्रीट वर्क - 1400/5800 Cum.

2. 32 मिमी रॉक अँकर वर्क (ड्रिलिंग + ग्राउटिंग) - 3200/4660 Rmt.

3. सब सरफेस ड्रेन होल वर्क (ड्रिलिंग + पीव्हीसी पाईप घालणे)- 480/2520 Rmt.

4. मेष वर्क (स्पायडर + टेको) - 72/936 चौ.मी.

5. प्री-स्ट्रेस्ड अँकर वर्क (ड्रिलिंग + स्ट्रँड्स + ग्राउटिंग)- 210/2720 Rmt.

   शारीरिक प्रगती : 65% 

  आर्थिक प्रगती : 55%

7अ) प्रकल्पाचे नाव : जनता कॉलनी, जोगेश्वरी येथे वाहन सबवेचे रुंदीकरण आणि बांधकाम @ Ch. 516/800 वेस्टर्न एक्सप्रेस हायवे क्रमांक 6 वर.

प्रकल्प वैशिष्ट्य :

  · प्रकल्पात जनता कॉलनी येथील विद्यमान वाहन अंडरपासचे रुंदीकरण, जोगेश्वरी येथे छ. वेस्टर्न

 एक्सप्रेस हायवे क्रमांक 6 वर 516/800.

  · सदर काम पश्चिम महामार्गाच्या खाली केले जाईल ज्यात वाहतुकीचा प्रवाह जास्त आहे.

प्रकल्पाचे तपशील :

  1) प्रकल्पाची किंमत                   : रु. 20.6 कोटी

  2) प्रकल्पाची प्रारंभ तारीख              : 05.03.2019

  3) प्रकल्पाची वेळ मर्यादा               : 18 महिने

  4) करारानुसार पूर्ण होण्याची तारीख        : 6 सप्टेंबर, 2020

  5) EOT नुसार पूर्ण होण्याची तारीख        : 23 डिसेंबर, 2022

  6) प्रस्तावित रचना

  अ) अंडरपासची लांबी - 39.8 मी.

  ब) अंडरपासची रुंदी - 17.8 मी.

  c) जोगेश्वरी स्टेशनला जनता कॉलनीला जोडणारा वाहन अंडरपास

सद्यस्थिती : -

 पहिला टप्पा पूर्ण होण्याच्या जवळ आहे.

  अ) शारीरिक प्रगती - 20%

  ब) आर्थिक प्रगती - 22%

8)प्रकल्पाचे नाव : मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पातंर्गत सांताक्रुझ-चेंबुर जोडरस्त्याचे वाकोला जं.आंबेडकर चौक/युनिर्व्हसिटी जं. व बीकेसी जं. मिळून मिठी नदी ते वाकोला पुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे व MTNL जं., बीकेसी ते एलबीएस मार्ग उड्डाणपुलाला जोडणारा उन्नत मार्ग बांधणे भाग-1

प्रकल्पाची ठळक वैशिष्ठये :

  • बीकेसी येथील व्यापारी संकुलांची वाढ अभूतपूर्व आहे.
  • आयसीआयसीआय बँक, देना बँक, वोक्हार्ट, रिलायन्सचे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, भारत डायमंड बार्स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, यूएस कॉन्सुलेट इत्यादी सर्व क्षेत्रांमधून शहराच्या या भागात प्रमुख कॉर्पोरेट्सने त्यांची मुख्य कार्यालये स्थापन केली आहेत.
  • शहराच्या भौगोलिक मध्यभागी असल्याने, सर्व दिशेने बीकेसीकडे येणारी वाहतूक  असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
  • त्याकरीता बीकेसीच्या सभोवतालचा रस्ते विकसित करुन कमीतकमी वेळेत वाहतुक सूरळीत होण्यासाठी व तसेच उन्न्त मार्ग कॉरिडॉरद्वारे बीकेसीला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणे आवश्यक आहे.

प्रकल्पाची माहिती :

अ.क्र. तपशिल माहिती
1 लांबी 5.9 कि.मी.
2 रुंदी 17.2 मी./ 8.5मी. (चार/ दोन पदरी)
3 सुधारीत प्रकल्पाची किंमत रु. 645 कोटी.
4 कार्यारंभ आदेश 27/10/2016
5 काम पूर्णत्वाचा दिनांक 31/03/3022

 

प्रकल्पाची फायदे :

रस्ता जोडणी: पूर्व द्रुतगती महामार्ग पासून पश्चिम द्रुतगती महामार्गा पर्यंत. वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत : 45 मिनिटे.

सद्यस्थिती :

प्रकल्पाचे झालेले अंदाजित काम 69% आहे

8अ) प्रकल्पाचे नाव : भारत डायमंड कंपनी, वांद्रे – कुर्ला संकुल ते वाकोला जंक्शन येथे जोडणारा उन्नत मार्ग बांधणे. भाग-2

प्रकल्पाची ठळक वैशिष्ठये :

  • बीकेसी येथील व्यापारी संकुलांची वाढ अभूतपूर्व आहे. आयसीआयसीआय बँक, देना बँक, वोक्हार्ट, रिलायन्सचे आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर, भारत डायमंड बार्स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टेट बँक ऑफ इंडिया, नाबार्ड, यूएस कॉन्सुलेट इत्यादी सर्व क्षेत्रांमधून शहराच्या या भागात प्रमुख कॉर्पोरेट्सने त्यांची मुख्य कार्यालये स्थापन केली आहेत.
  • शहराच्या भौगोलिक मध्यभागी असल्याने, सर्व दिशेने बीकेसीकडे येणारी वाहतूक  असल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.
  • त्या करीता बीकेसीच्या सभोवतालचा रस्ते विकसित करुन कमीतकमी वेळेत वाहतुक सूरळीत होण्यासाठी व तसेच उन्न्त मार्ग कॉरिडॉरद्वारे बीकेसीला ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जोडणे आवश्यक आहे.

प्रकल्पाची माहिती :

अ.क्र. तपशिल माहिती
1 लांबी 1.4 किमी
2 रुंदी 17.2 मी/ 8.5मी. (चार/ दोन पदरी)
3 सुधारीत प्रकल्पाची किंमत रु. 196 कोटी.
4 कार्यारंभ आदेश 18/10/2017
5 काम पूर्णत्वाचा दिनांक 31/12/2021

 

प्रकल्पाची फायदे :

 वांद्रे –कुर्ला संकुल पासून पश्चिम द्रुतगती महामार्ग  पर्यंत वाहतुकीच्या वेळेत होणारी बचत:35 मिनिटे.

सद्यस्थिती :

 प्रकल्पाचे झालेले अंदाजित काम 49% आहे.

9) शिवडी ते वरळी उन्नत मार्ग प्रकल्प.

प्रकल्प वैशिष्ट्य :

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या वाहतूक विखुरण प्रणालीचा एक भाग म्हणून शिवडी वरळी उन्नत मार्ग अंमलबजावणी करत आहे.
  • प्रस्तावित लिंक 2+2 मार्गिका उन्नत मार्ग असून त्याची लांबी 4.5 कि.मी. आहे.
  • सदर उन्नत मार्ग हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प, वांद्रे वरळी सी लिंक आणि मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवरील कोस्टल रोड प्रकल्पाशी जोडणारा मार्ग आहे.

प्रकल्पाचे तपशील:

1 कार्यारंभ आदेश दिनांक : 13 जानेवारी,2021
2 कालावधी : 36 महिने म्हणजे 12.01.2024 पर्यंत.
3 प्रकल्पाची रक्कम : 1051.86 कोटी (वस्तू व सेवा करासह)
4 शिवडी वरळी पुलाची लांबी : 4512.86 मी.
5 रॅम्पची लांबी : 2900 मी.
6 उड्डाणपुलाची रुंदी : 17.00 मी.

 

कामाची सद्यस्थिती:

  • उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी बॅरीकेट्स लावण्याचे काम, भुतांत्रिक तपासणी करणे (जिओटेक्निकल तपास) आणि विविध पायांच्या बांधकामामध्ये बाधित होणाऱ्या विविध सेवावाहिन्यांचे स्थलांतरणाचे प्रस्ताव तयार करुन संबंधित संस्थांकडे पाठविण्याची कामे  इ. कामे प्रगतीपथावर आहेत.
  • सद्य:स्थितीत  उड्डाणपुलाच्या पाया बांधकामाचे एकूण 18 पाईलचे काम पूर्ण झाले.

ऑक्टोबर, 2021 च्या अखेरीपर्यंत आर्थिक प्रगती : 3.00%.

10) ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प भाग- 1- ठाणे बेलापूर रोड आणि राष्ट्रीय महामार्ग -4 दरम्यान एलिव्हेटेड रोडचे डिझाईन आणि बांधकाम

प्रकल्पाची वैशिष्टये:- 

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे ऐरोली ते कटाई नाक्यापर्यंत 12.30 किमी उन्नत रस्ता हा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे.
  • सदर प्रकल्पामुळे कल्याण - डोंबिवली आणि नवी मुंबई मधील अंतर 7 कि.मी. ने कमी होईल.
  • सदर उन्नत रस्ता प्रकल्पामुळे कल्याण, डोंबिवलीउल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर रस्त्याच्या वाहतुकीवर मोठया प्रमाणात फायदा होईल.
  • सदर उन्नत रस्ता प्रकल्प हा मुलुंड- ऐरोली उड्डाणपूल ते ठाणे बेलापूर रस्त्यापर्यंत आहे.
  • सदर रस्ता हा महाराष्ट्र राज्य औदयोगिक विकास महामंडळाचे क्षेत्र पारसिक डोंगरामधील बोगदा व राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पर्यंत आहे.

      या प्रकल्पामुळे नवी मुंबई ते मुंब्रा चे अंतर 8.00 कि.मी. ने कमी होऊन अंदाजे 15.00 मिनिट वेळेची बचत करेलतसेच हा रस्ता अलिबाग विरार मल्टिमॉडेल कॉरिडोअर या रस्त्याला पूरक असा फाटा असेल.

प्रकल्पाचा तपशील:

  1. प्रकल्पाची किंमत                            : रु. 144.47 कोटी
  2. प्रकल्पाचा प्रारंभ दिनांक                   : दिनांक 06/11/2017
  3. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी          : 30 महिने
  4. मुदतवाढ                                       : 05/03/2021
  5. प्रकल्प पूर्ण होण्याचा दिनांक              : 05/03/2022

प्रस्तावित रचना:

  1. लांबी   : 928 मी.
  2. रुंदी     : 24.00 मी.

प्रकल्पाची सद्यस्थिती:

  1.  वास्तविक प्रगती – 71.25%
  2. आर्थिक प्रगती  - 69.98%

10अ) प्रकल्पाचे नाव :  ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्प – ठाणे बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग – क्र. 4  - बोगदयाचे व रस्त्याचे बांधकाम

प्रकल्पाची वैशिष्टये:

  • ​ मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऐरोली ते कटाई नाका पर्यंत 12.30 कि.मी. उन्नत बांधण्याचे काम हाती घेतले आहे.
  • या प्रकल्पामुळे कल्याण- डोंबिवली आणि नवी मुंबई मधिल अंतर 7 कि.मी. ने कमी होणार आहे.
  • कल्याण- डोंबिवलीच्या नागरीकांबरोबरच उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरच्या नागरीकांना सुध्दा या प्रकल्पाचा फायदा होणार आहे
  • भाग-1 प्रकल्पामधील रस्ता हा ठाणे बेलापूर रस्ता पासून सुरु होऊन महाराष्ट राज्य औदयोगिक विकास महामंडळाच्या क्षेत्र तसेच पारसिक डोंगरातून 1.69 कि.मी. लांबीचा दोन मार्गिकेचा (Twin Tunnel) बोगदा व राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 पर्यंत रस्त्याचा समावेश आहे.

प्रकल्पाचा तपशील :

1)    प्रकल्पाची किंमत                   : रु. 237.55 कोटी

2)   प्रकल्पाचा प्रारंभ दिनांक           : दिनांक 04/05/2018

3)   प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी  : 40 महिने

4)  प्रकल्प पूर्ण होण्याचा दिनांक       : 03/09/2021

प्रस्तावित रचना :

1)      भुयारी मार्गाची लांबी   : 1690 मी.

          भुयारी मार्ग              : 2 मार्गिका

2)     भुयारी मार्गाची रुंदी     : 17.50 मी.

        खुल्या रस्त्याची लांबी    : 810 मी.

प्रकल्पाची सद्यस्थिती:

       1. वास्तविक प्रगती – 45.86%

       2.आर्थिक प्रगती  -    44.20%

10 ब)  मुलुंड-ऐरोली पूल ते ठाणे – बेलापूर रस्ता दरम्यानच्या उन्नत रस्त्याचे बांधकाम करणे

प्रकल्पाची वैशिष्टये:-

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ऐरोली ते कटाई नाका पर्यंत 12.30 कि.मी. उन्नत रस्ता प्रकल्प हाती घेतला आहे.
  • या प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली ते मुंबई हे अंतर 10 कि.मी. ने कमी होण्याची शक्यता आहे. सध्या प्रवाशांना महापे किंवा ठाणे येथून मार्ग काढणे आवश्यक आहे. ज्यामुळे गर्दीच्या वेळी प्रवासाच्या वेळेत भर पडते. हे मल्टीमोडल कॉरीडॉरसाठी फीडर म्हणून काम करेल.
  • प्रकल्प भाग-2 हा एकूण सहा मार्गिकेचा उन्नत रस्ता असून सदर प्रकल्प मुलुंड पूल (ऐरोली बाजू) पासून सुरु होऊन ठाणे बेलापूर रस्ता पर्यंत एकूण 12.30 कि.मी. लांबीचा आहे.

प्रकल्पाचा तपशील:

  1. प्रकल्पाची किंमत                       : रु. 275.90 कोटी
  2. प्रकल्पाचा प्रारंभ दिनांक              : दिनांक 28/11/2018
  3. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी    : 30 महिने
  4.  मुदतवाढ                                 :  19 महिने
  5. प्रकल्प पूर्ण होण्याचा दिनांक        : 31/12/2022

प्रस्तावित रचना:

  1. पुलाचा लांबी : 2742.28 मी.
  2. पुलाची रुंदी : 24.20 मी.

प्रकल्पाची सद्यस्थिती:

  1. वास्तविक प्रगती – 32%
  2. आर्थिक प्रगती  - 25.65%

11) कल्याण बाह्य वळण रस्ता: भाग 4,5,6 व 7 (दुर्गाडी चौक ते टिटवाळा)

प्रकल्पाची वैशिष्टये:

  • कल्याण डोंबिवली महानगरपालिका (कडोंमपा) मंजूर आराखड्यानुसार कल्याण बाह्य वळण रस्ता विकसित करण्यात येत आहे. सदर रस्ता बदलापूर काटई रस्त्यावरील हेदुटणे गावापासून सुरु होतो, भोपर गावाजवळ शिळ-कल्याण-भिवंडी रस्ता ओलांडतो, दिवा- वसई लुप मार्ग व मध्य रेल्वे मार्ग (कोपर रेल्वे स्टेशन परिसर) ओलांडतो, मोठागांव-माणकोली लिंक रस्त्याला जोडतो, दिवा वसई रेल्वे  लाईन ओलांडतो, पुढे उल्हास नदीला समांतर जाऊन दुर्गाडी पुलाजवळ शिळ-कल्याण-भिवंडी रस्त्याला जोडतो आणि टिटवाळा येथे संपतो.
  • पडघा-नाशिक महामार्ग तसेच गुजरात राज्य आणि पुणे शहर व कर्नाटक राज्यातून येणारी व  सध्या कडोंमपाच्या अंतर्गत रस्त्यावरुन ये-जा करणारी वाहतूक ही कल्याण बाह्य वळण रस्त्याच्या नवीन मार्गावर वळवली जाऊन कडोंमपाच्या अंतर्गत रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणे अपेक्षित आहे.
  • दुर्गाडी चौक ते टिटवाळा (16.40 किमी.) ह्या रस्त्याचे काम सध्या हाती घेण्यात आले असून हेदुटणे ते गोंविदवाडी बायपास दरम्यानच्या रस्त्याचे बांधकाम द्वितीय टप्प्यामध्ये हाती घेण्याचे नियोजन आहे.
  • स्व: निधीमधून रस्ता बांधणे ही मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची जबाबदारी असून सदर रस्त्यासाठी मोफत जमीन उपलब्ध करुन देणे ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची जबाबदारी आहे.

प्रकल्पाचा तपशील :

  1. कामाची किंमत          : रु. 278.93 कोटी.
  2. कार्यारंभ आदेश         : 14/08/2017.
  3. कामाचा कालावधी     : 24 महिने.
  4. अपेक्षित काम पूर्णत्व  : दि. 31/03/2022.
  5. प्रकल्पाचा तपशील     :
  • लांबी:  16.40 किमी.
  • रुंदी: 30/45 मी.
  • डांबरी मार्गिका 02+02 लेन आणि उर्वरित भागात  कच्ची मार्गिका.
  • रस्त्याच्या दोन्ही बाजूस पर्जन्यवाहिन्या
  • विकसित परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूस पदपथ

सद्यस्थिती :

    कल्याण बाह्य वळण रस्त्याच्या 76% लांबीमध्ये (12.6 किमी.) काम पूर्णत्वाच्या दिशेने आहे. अतिक्रमण हटविणे आणि उर्वरित जमीन उपलब्ध करुन देणे याची कार्यवाही कडोंमपाकडून करण्यात येत आहे.

  1. भैतिक प्रगती- 76%
  2. आर्थिक प्रगती- 71%

12) पूर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी, ठाणे येथील रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करणे.

प्रकल्पाची माहिती :

  • पूर्व द्रुतगती महामार्गावरील ठाणे कोपरी येथील असलेल्या रेल्वे ओलांडणी पुलाचे रुंदीकरण व बांधकाम करणे.
  • सदर काम दोन टप्प्यांत करण्यात येत असून प्रथम टप्प्यात अस्तित्वातील पुलाशेजारी प्रत्येकी 2 मार्गिकांचे बांधकाम करण्यात  आले असून त्यावरुन दि.09.10.2021 रोजी पासून वाहतूक खुली करण्यात आली आहे.
  • या मार्गिकांवरुन वाहतूक वळवुन अस्तित्वातील पुल तोडण्यात येणार आहे.
  • तद्नंतर या ठिकाणी 2+2 मार्गिकांच्या नव्या पुलाचे बांधकाम करण्यात येईल.
  • याप्रमाणे कोपरी येथे 4+4 मार्गिकांचा रेल्वे ओलांडणी पुल उपलब्ध होईल.

प्रकल्पाची वैशिष्टे :

1.  कामाची किंमत                                       :    रु. 258.76 कोटी.

2.  काम सुरु झाल्याचा दिनांक                        :    24/04/2018

3.  कामाची मुदत                                         :    36 महिने

4.  प्रथम टप्पा पूर्ण                                       :    दि. 09.10.2021

5.  काम पूर्ण करण्याचा अपेक्षित दिनांक           :  31 डिसेंबर, 2022

6.  पुलाची माहिती                                        :    अ. पुलाची लांबी – 784 मी.

                                                                     ब. पुलाची रुंदी – 37.40 मी.

7.  इतर कामे                                              :   अ)  ज्ञानसाधना कॉलेज ते नौपाडा जोडणारा भुयारी मार्ग

                                                                     ब)   आनंद नगर जवळ भुयारी मार्ग

                                                                    क)  चिखलवाडी जवळील नाला.

प्रकल्पाची सद्यस्थिती : 

            प्रथम टप्प्याचे काम पूर्ण  करुन वाहतुकीस उपलब्ध करण्यात आला आहे.

  1. भौतिक प्रगती – 64%
  2. आर्थिक प्रगती – 61% 

13) राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर वाय जंक्शन मुंब्रा येथे उड्डाणपूलाचे बांधकाम, शिळफाटा येथे उड्डाणपूल तसेच कल्याण फाटा येथे उड्डाणपूलाचे व भुयारी मार्गाचे बांधकाम.

प्रकल्पाची वैशिष्टये:

  • मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 (जुना मुंबई पुणे महामार्ग) वर मुंब्रा येथील वाय जंक्शन ते शिळफाटा जंक्शन पर्यंत उड्डाणपूलाचे व रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. तसेच शिळफाटा जंक्शन येथील उड्डाणपूल, कल्याण फाटा जंक्शन येथे उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आलेले आहे. 
  • सदर प्रकल्पामध्ये राष्ट्र्रीय महामार्ग क्र. 4 (जुना मुंबई पुणे महामार्ग) रस्त्याने बाधित होणारे अतिक्रमणाचे निष्कासन करुन रस्ता रुंदीकरण करणे, सेवा वाहिन्यांचे स्थलांतरण, उच्च दाबाच्या विदयुत लाईन यांचे स्थलांतरण, इ. बाबींचा समावेश आहे.
  • सदर प्रकल्पाचे कामामुळे मुंब्रा वाय जंक्शन ते कल्याण फाटा तसेच कल्याण डोंबिवली वरुन नवी मुंबई या दिशेकडील वाहतुक कोंडी सोडविण्यास मदत होणार आहे.

प्रकल्पाचा तपशील:

    1) मुंब्रा वाय जंक्शन :

  1. प्रकल्पाची किंमत                             : रु. 97.97 कोटी
  2. प्रकल्पाचा प्रारंभ दिनांक                    : 09/06/2017
  3. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी          : 30 महिने
  4.  मुदतवाढ दिनांक                              :  31/12/2021
  5. प्रकल्प पूर्ण होण्याचा दिनांक                : 08/12/2019

    2) कल्याण फाटा- शिळ फाटा जंक्शन :

  1. प्रकल्पाची किंमत                             : रु. 191.17 कोटी
  2. प्रकल्पाचा प्रारंभ दिनांक                       : 09/04/2021
  3. प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी  : 30 महिने
  4.  प्रकल्प पूर्ण होण्याचा दिनांक                 : 08/10/2023

प्रस्तावित रचना:

  1. मुंब्रा वाय जंक्शन : 1) लांबी : 810 मी.  2)  रुंदी : 24.20 मी.
  2. कल्याण फाटा जंक्शन: 1) लांबी : 1367.47 मी.  2)  रुंदी : 12.00 मी.
  3. शिळ फाटा जंक्शन: 1) लांबी : 739.50 मी.  2)  रुंदी : 24.20 मी.

प्रकल्पाची सद्यस्थिती:

  1. मुंब्रा वाय जंक्शन : 1) वास्तविक प्रगती – 76%  2) आर्थिक प्रगती  - 76%
  2. कल्याण फाटा- शिळ फाटा जंक्शन : सध्या शिळफाटा जंक्शन आणि कल्याणफाटा जंक्शनवरील उड्डाणपुलांसाठी भौगोलिक सर्वेक्षण आणि माती तपासणी सुरू आहे.

14) मुंबई - पुणे (जुन्या) राष्ट्रीय महामार्गावर नावडे फाटा जंक्शन येथे उड्डाणपुलाचे बांधकाम व रस्त्याचे रुंदीकरण करणे.

प्रकल्पाची वैशिष्टये :

नावडे फाटा येथील उड्डाणपूलाच्या बांधकामामुळे महाराष्ट्र उदयोग क्षेत्र, तळोजा तसेच नाशिक महामार्ग (रा.रा. 160) व अहमदाबाद महामार्ग (रा.रा. 48) येथून जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला ये-जा  करणा-या वाहतूकीमुळे होणा-या कोंडीची समस्या दूर करण्याकरीता उपयुक्त आहे.         

प्रकल्पाची माहिती :

एकूण लांबी (दोन्ही बाजूस) 1210 मी

उड्डाणपुलाची एकुण लांबी व रुंदी:  380.0मी. व 23.20 मी.

अनिवार्य गाळा - 1 x 60 मी. (स्ट्रक्चरल स्टीलमध्ये) :  60 मी.

इतर गाळे - 16 x 20 मी. : 320 मी.

पुणे बाजू: 422.83 मी.

मुंबई बाजू: 307.15 मी.

स्लीप  रस्ता, लांबी व रुंदी (2+2 लेन) :  1210.0 मी. व रुंदी 7.935 मी.

पर्जन्य जलवाहिन्या व सेवा वाहिन्यांसहित, पदपथ (दोन्ही बाजूस) : 1210.0 मी. व रुंदी 2.5 मी.

नावडे गावासमोर वेहीक्युलर अंडरपास (Vehicular Under-Pass) : रुंदी -10.5 मी., उंची- 4 मी.

कंत्राटदाराचे नाव : मे.टी.ॲन्ड.टी. इन्फ्रा लि.

प्रकल्प सल्लागाराचे नाव : मे. श्रीखंडे कन्सल्टंट प्रा‍.लि.

प्रकल्पाची किंमत : रु. 59.28 कोटी.

कार्यारंभ आदेश : दि.14.12.2017

काम पुर्ण करण्याचा दिनांक :  13.08.2019.

कामास मुदतवाढ दिनांक: 30.11.2021.

प्रकल्पाची सद्य‍स्थिती  :

काम प्रगतीपथावर

 भौतिक प्रगती - 92%

आर्थिक प्रगती -  91%

15) माणकोली मोठागाव जोडरस्त्याचे बांधकाम करणे

प्रकल्पाचे वैशिष्ट्य : -

  • सदर रस्त्याचे काम हे माणकोली मोटागाव जोडरस्त्याचे बांधकामाशी संबंधित आहे.
  • सदररस्ता हा डोंबिवलीहून NH-160 (जुना NH-3) मार्गे ठाणे आणि मुंबईला पोहोचण्यासाठी वाहतुकीचा जलद वितरण आहे.  
  • आणि NH-160 (जुना NH-3) ते प्रस्तावित कल्याण रिंग रोड - काटाई नाका - बदलापूर - कर्जत
  • - हल मार्गे खोपोली येथेजाण्यासाठीमुंब्रा, शीळ फाटा, कळंबोली आणि पनवेल या वस्तीच्या भागात न
  •  जाता पोहोचता येईल.

प्रकल्पाचा तपशिल: -

 1) प्रकल्पाची किंमत                               - रु. 74.41 कोटी

 2) प्रकल्प सुरुवात झाल्याचा दिनांक          - 13/09/2019

 3) काम पूर्ण करण्याचा कालावधी             - 18 महिने (पावसाळ्यासहित)

 4) मुदतवाढ                                          -  डिसेंबर, 2021 पर्यंत

पुलाचा तपशिल :

  अ)   रस्त्याची लांबी                         - 3.30 मी.        

  ब) रस्त्याची रुंदी                             - 30.00 मी. (2 +2 मार्गिका)

सद्यस्थिती :

  a)      काम पूर्ण                               -  54%

 ब्‍) आर्थिकतपशील            -  51%

16) प्रस्तावित माणकोली मोटागाव लिंक रोडवरील उल्हास खाडीवर सहा पदरी पुलाचे बांधकाम करणे

प्रकल्पाचे वैशिष्ट्य :

- सदर पुलाचे कामहे काम प्रस्तावित माणकोली मोटागाव लिंक रोडवरील उल्हास खाडीवर सहा पदरी

 पुलाच्या बांधकामाशी संबंधित आहे.

- सदर पुल हा डोंबिवलीहून NH-160 (जुना NH-3) मार्गे ठाणे आणि मुंबईला पोहोचण्यासाठी वाहतुकीचा

 जलद वितरण आहे. 

- आणि NH-160 (जुना NH-3) ते प्रस्तावित कल्याण रिंग रोड - काटाई नाका - बदलापूर - कर्जत -

हल मार्गे खोपोली येथेजाण्यासाठीमुंब्रा, शीळ फाटा, कळंबोली आणि पनवेल या वस्तीच्या भागात न जाता

पोहोचता येईल.

प्रकल्पाचा तपशील 

1) प्रकल्पाची किंमत                        - रु. 223.25 कोटी

2) प्रकल्प सुरु झाल्याचा दिनांक         - 14/03/2016

3) काम पूर्ण करण्याचा कालावधी       - 36 महिने (पावसाळ्यासहित)

4) मुदतवाढ                                   - मार्च, 2022 पर्यंत

पुलाचा तपशिल  :

अ) पुलाची लांबी                             - 1306 मी.     

ब्‍) पुलाची रुंदी                               - 27.5 मी. (3 +3 मार्गिका)

सद्यस्थिती :

अ)  काम पूर्ण            - 55%

ब)आर्थिक तपशील -53%

17) दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधकाम करणे

प्रकल्पाची वैशिष्टये :                                            

  • विषयांकित पुलाचे बांधकाम उल्हास खाडीवर आणि कल्याण-भिवंडी-आदिलाबाद रोड राष्ट्रीय महामार्ग-222 वर दुर्गाडी किल्ल्याजवळ करण्यात येत आहे.
  • अस्तित्वातील दोन पदरी पुल वाहतूकीसाठी अपुरा पडत असल्याने दुर्गा चौक आणि कोन गावाच्या बाजूकडील कल्याण भिवंडी रस्त्यावर वाहतूक कोंडी होते.
  • सध्याची वाहतूक कोंडी आणि भविष्यातील अपेक्षित वाहतूक लक्षात घेता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण स्व: निधीतून अतिरिक्त सहा पदरी पुलाचे बांधकाम करीत आहे.

प्रकल्पाचा तपशील :

  1. एकूण खर्च         :  रु. 103.43 कोटी
  2. कार्यारंभ आदेश     : दि. 08/03/2019.
  3. कामाचा कालावधी  : 18 महिने
  4. अपेक्षित कार्य पूर्णत्व : दि. 31/12/2021.
  5. प्रकल्पाचा तपशील :
  1. पुलाची एकूण लांबी: 820.60 मी.
  2.  पुलाची रुंदी: 25.30 मी.
  3. एकूण मार्गिका: 6 (2+4) व फूटपाथ 1.50 मी रुंद (गणेश घाटाच्या बाजूला)
  4. एकूण  गाळे:

a. नौका वहन गाळा : 1 गाळा (82.50 मी) (+) अनिवार्य 2 गाळे (प्रत्येकी 45.25 मी)
b.इतरगाळे:6गाळे(प्रत्येकी34.60मी.)

5.संरचना: 3+3 पदरी आरसीसी प्रीस्ट्रेस्ड गर्डर आणि बॅलन्स कॅन्टिलीव्हर सुपर स्ट्रक्चरसह अँटी क्रॅश बॅरियर्स, रस्ता दुभाजक व  पदपथ, आरसीसी खांब, पाइल फाउंडेशन आणि नौकावहन गाळ्यामधील खाबांना फेंडर पाइल.

सद्यस्थिती :

दि. 31/05/2021 रोजी 2 पदरी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला असून उर्वरित 4 पदरी पूल दि. 31/12/2021 पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

  1. भैतिक प्रगती- 88.15%
  2. आर्थिक प्रगती- 87.61%

18) OARDS Works

i) बाहय रस्ते विकास योजनेअंतर्गत अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील (1) खामकर  वाडी ते लादी नाका (2) बेथल चर्च ते फुले नगर (3) जांभूळ नाका ते वॉटर ट्रिटमेंट प्लॉन्ट येथील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारीकरण करणे.

;अ.क्र. तपशिल माहिती
1 कार्यारंभ आदेश दिनांक 03/05/2018
2 प्रकल्पाची किंमत रु.: 28.98 कोटी
3 प्रकल्पाची माहिती
  1. खामनगर वाडी ते लादी नाका लांबी :
    1.75 कि.मी. रुंदी: 24 मी. (4 पदरी)
  2. बेथल चर्च ते फुलेनगर लांबी :
    0.730 कि.मी. रुंदी: 18 मी. (4 पदरी)
  3. जांभुळनाका ते वॉटर ट्रिटमेंट प्लान्ट लांबी :
    1.200 कि.मी. रुंदी: 18 मी. (4 पदरी)
4 काम पुर्णत्वाचा निर्धारीत दिनांक 02/05/2019
5 मुदतवाढ दिनांक  31/12/2020 पर्यंत
6 सद्यस्थिती उपलबध जागेत काम पूर्ण करण्यात आले.


ii) बाहय रस्ते विकास योजनेअंतर्गत अंबरनाथ नगरपरिषद हद्दीतील (1) एम.आय.डी.सी. पाईप लाईन ते शिवाजी चौक (2) स्वामी समर्थ चौक ते  लोकनगरी  पुल  येथील रस्त्याचे रुंदीकरण व सुधारीकरण करणे.

अ.क्र. तपशिल माहिती
1 कार्यारंभ आदेश   20/04/2018
2 प्रकल्पाची किंमत रु.: 23.38 कोटी
3 प्रकल्पाची माहिती
  1. एम.आय.डी.सी. पाईप लाईन ते शिवाजी चौक लांबी :
    1.470 कि.मी. रुंदी: 18 मी. (4 पदरी)
  2. स्वामी समर्थ चौक ते लोकनगरी पुल लांबी :
    0.570 कि.मी. रुंदी: 24 मी. (4 पदरी)
4 काम पुर्णत्वाचा निर्धारीत दिनांक 20/04/2019
5 मुदतवाढ दिनांक  19/10/2020 पर्यंत
6 सद्यस्थिती काम पूर्ण

 

iii) बाहय रस्ते विकास योजनेअंतर्गत  उरण नगर परिषद हद्दीतील उरण बस स्टॅण्ड ते नेव्ही गेट रस्त्याचे काँक्रीटीकरण करणे.

अ.क्र. तपशिल माहिती
1 कार्यारंभ आदेश दिनांक 17/11/2017
2 प्रकल्पाची किंमत रु. 14.64 कोटी
3 प्रकल्पाची माहिती लांबी : एकूण 1.425 कि.मी. रुंदी: 15 मी (दोन पदरी)
4 काम पुर्णत्वाचा निर्धारीत दिनांक 16/02/2019
5 मुदतवाढ दिनांक 05/11/2019
6 सद्यस्थिती काम पूर्ण