मेट्रो मार्ग -२अ
मुंबई मेट्रो मार्ग २अ (दहिसर - डी एन नगर )
- दहिसर ते डी एन नगर पर्यंत मेट्रो मार्ग 2अ हा 18.6 किमी लांबीचा असून एकूण 17 उन्नत स्थानकांचा समावेश आहे.
- सदर मार्गाने मेट्रो मार्ग 1 (घाटकोपर ते वर्सोवा), सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग 2ब (डी एन नगर ते मंडळे) आणि मेट्रो मार्ग 7 (अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व)) आणि मेट्रो मार्ग 6 (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) यांच्यात परस्पर संपर्क साधला जाईल.
- चारकोप/मालवणी येथे गाड्यांच्या देखभालीसाठी 16.4 हेक्टर जागेवर डेपो बांधण्यात आला आहे आणि 29 जानेवारी 2021 रोजी मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सदर डेपोचे उद्घाटन करण्यात आले.
- या प्रकल्पामुळे मुंबईतील दहिसर (पू) ते डी एन नगर या सर्वात व्यस्त मार्गावरील (नवीन लिंक रोड) वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
- दहिसर आणि डी एन नगर येथील उपनगरीय रेल्वे प्रणाली आणि एमआरटी प्रणालीसह सुगम आणि कार्यक्षम आदानप्रदान सुलभ करेल.
- सदर मार्ग पश्चिम, मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबई दरम्यान जोडणी प्रदान करेल.
- सदर मार्ग मुंबईतील व्यावसायिक आणि महत्त्वाच्या भौगोलिक ठिकाणांवर रेल आधारित प्रवेश प्रदान करेल.
- सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
86
मार्गाची लांबी | 18.6 कि.मी. (उन्नत) | |
मार्गाचा रंग | पिवळा | |
एकूण स्थानके | 17(सर्व उन्नत) | |
1. दहिसर (पू), 2. आनंद नगर, 3. कांदरपाडा, 4. मंडपेश्वर-आय सी कॉलनी, 5. एकसर, 6.बोरीवली (प), 7. पहाडी एकसर, 8. कांदिवली (प), 9. डहाणूकरवाडी, 10. वळनई, 11. मालाड (प), 12. लोअर मालाड, 13. पहाडी गोरगाव,14. गोरेगाव (प) , 15. ओशिवरा, 16. लोअर ओशिवरा, 17. अंधेरी (प) | ||
देखभाल दुरुस्ती डेपो | मालवणी (चारकोप) (16.4 हेक्टर) | |
स्थानके जोडणी |
|
|
प्रकल्प पुर्णत्वाची किंमत | रु.6,410 कोटी | |
दैनंदिन प्रवासी संख्या: | ||
2031 | दैनंदिन प्रवासी - 6.09 लाख (प्रतिदिन प्रतितास 15565) |
87
- टप्पा 1 (दहिसर- डहाणूकरवाडी)–
9.8 किमी, 9 स्थानकांसह (दहिसर (पू), आनंद नगर, कांदरपाडा, मंडपेश्वर-आय सी कॉलनी, एकसर, बोरीवली (प), पहाडी एकसर, कांदिवली (प), डहाणूकरवाडी) 2 एप्रिल 2022 रोजी कार्यान्वित झाला.
- टप्पा 2 (डहाणूकरवाडी - डी एन नगर) –
8.8 किमी, 8 स्थानकांसह (वळनई, मालाड (प), लोअर मालाड, पहाडी गोरगाव, गोरेगाव (प), ओशिवरा, लोअर ओशिवरा, अंधेरी (प)) 19 जानेवारी 2023 पासून कार्यान्वित झाला आहे.
88
89