मेट्रो मार्ग - ७
मेट्रो मार्ग 7 (अंधेरी पूर्व - दहिसर पूर्व )
- अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो मार्ग 7 हा 16.5 किमी लांबीचा असून एकूण 13 उन्नत स्थानके आहेत.
- मेट्रो मार्ग 7 द्वारे पश्चिम द्रुतगती महामार्ग, मेट्रो मार्ग 1 (घाटकोपर ते वर्सोवा), सध्या सुरू असलेली मेट्रो मार्ग 2अ (दहिसर ते डी एन नगर) आणि मेट्रो मार्ग 6 ((स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) दरम्यान परस्पर संपर्क साधण्यात येईल.
- या प्रकल्पामुळे अंधेरी, जेव्हीएलआर आणि दहिसर येथील उपनगरीय रेल्वे प्रणाली आणि एमआरटी प्रणाली सहजतेने आणि कार्यक्षम देवाणघेवाण सुलभपणे होईल.
- हा प्रकल्प मध्य मुंबई आणि उत्तर उपनगरी मुंबई दरम्यान जोडणी प्रदान करेल.
- हा प्रकल्प मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए), सीप्ज़, नॅशनल पार्क आणि इतर व्यावसायिक आणि महत्वाच्या भौगोलिक ठिकाणी रेल्वे आधारित प्रवेश प्रदान करेल.
- हा प्रकल्प सध्याच्या प्रवासाची वेळ रस्त्याच्या परिस्थितीनुसार 50% ते 75% पर्यंत कमी करेल.
119
मार्गाची लांबी | 16.5 कि.मी. (उन्नत) | |
मार्गाचा रंग | लाल | |
एकूण स्थानके | 13 (सर्व उन्नत) | |
1. गुंदवली, 2. मोगरा, 3. जोगेश्वरी (पूर्व), 4. गोरेगाव (पूर्व), 5.आरे, 6. दिंडोशी, 7. कुरार, 8.आकुर्ली, 9. पोईसर, 10. मागाठाणे, 11. देवीपाडा, 12. राष्ट्रीय उद्यान, 13. ओवरीपाडा | ||
उन्नत/भूमिगत | पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूने उन्नत | |
मेट्रो स्थानके जोडणी |
|
|
प्रकल्प पुर्णत्वाची किंमत | रु. 6,208 कोटी | |
दैनंदिन प्रवासी संख्या | ||
2031 | दैनंदिन प्रवासी - 6.7 लाख (प्रतिदिन प्रतितास 18,584) |
120
Updates as on 17 th April 2023
- टप्पा 1 (आरे- दहिसर)
10.7 किमी, 9 स्थानकांसह(आरे, दिंडोशी, कुरार, आकुर्ली, पोईसर, मागाठाणे, देवीपाडा, राष्ट्रीय उद्यान, ओवरीपाडा) 2 एप्रिल 2022 रोजी कार्यान्वित झाला.
- टप्पा 2 (आरे-अंधेरी)
5.8 किमी, 4 स्थानकांसह (गुंदवली, मोगरा, जोगेश्वरी (पूर्व), गोरेगाव (पूर्व)) 19 जानेवारी 2023 पासून कार्यान्वित झाला आहे.
121
122